पशूपालन गुरे पालन या विभागात पाळीव जनावरांच्या जाती, त्यांची निवड, निवारा, वासरांचे संगोपन, जनावरामधील वंध्यत्व, होणारे तोंडाचे तसेच पायांचे रोग आणि खाद्य यासंबधी माहिती दिली जाणार आहे. शेळी पालन  भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात अल्प भू – धारक, अत्यल्प भू – धारक, शेतमजूर व इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी शेळीपालन हा जोड व्यवसाय करतात. हा एक अत्यंत फायदेशीर व पूरक व्यवसाय आहे. थोडया श्रमात जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. कोंबडी पालन  कोंबडी पालन / कुक्कुटपालन / पोल्ट्री. संपूर्ण भारतात कोंबडी पालन हा शेतीला जोडधंदा म्हणून तसेच खाजगी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे मेंढी पालन  मेंढी पालन हा कोरड्या जमिनीवर शेती करणाऱ्यांसाठी फार महत्वाचा भाग असून कमीतकमी गुंतवणूक करून किरकोळ आणि लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योग बनू शकतो. तसेच मेंढी पालन हे छोट्याशा जागेवर किंवा एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते. इमू पालन  इमू पालन मोठ्या प्रमाणावर दोन हेतूंसाठी केले जाते. पहिले म्हणजे पुनरुत्पादान करून सक्षम व ...